ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पार पाडणार ही जबाबदारी
 
					
    मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडमध्ये मस्तानी म्हणूव प्रसिद्ध असलेली सौंदर्यवती अभिनेत्री दीपिका पदुकोण आता जागतिक पातळीवरही लोकप्रिय ठरत आहे. जगभरातील पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला आवर्जून आमंत्रित केले जाते. दीपिकावर आता ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात एक महत्त्वाती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
येत्या 12 मार्च रोजी रंगणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पुरस्कार जाहीर करताना दिसणार आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर तिच्यावर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. या वर्षी ‘चेल्लो शो’, ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत.
SL/KA/SL
3 March 2023
 
                            