राणा पाटील यांचे आरोप निराधार
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव (उस्मानाबाद)चे पालकमंत्री तानाजी सावंत चांगले काम करीत असताना ही जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केला आहे. अशा स्वरूपांचा आरोप विद्यमान सरकार मध्ये असूनही केला जात असल्याने आमदार राणा पाटील हे नेमके कोणत्या आधारावर आणि का बोलत आहेत असा सवाल धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय सालुंखे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, यातील 70 टक्के निधि हा विविध योजनांवर खर्च झाला असून 30 टक्के निधी जिल्हाधिकारी यांचे कडे शिल्लक आहे.मात्र तरीही भाजपचे विद्यमान आमदार राणा पाटील हे निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप करीत असून यात काहीच तथ्य नाही असे दत्तात्रय सालुंखे म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांचे उपसचिवाना पत्र
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी राज्याचे उपसचिव यांना पाठवलेल्या पत्रात निधी वाटपात कसलाच दुजाभाव झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलटपक्षी वाशी,भूम, परंडा या मतदारसंघासाठी 2555.46 लाख रुपयांचा निधी दिला आहे.तर राणा पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघासाठी 2,70572 लाख रुपयांचा निधी दिल्याचे स्पष्ट झाले. आहे.निधीवाटपातील दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करून पालकमंत्री सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या गटात परत प्रवेश करावा यासाठी तर हा खटाटोप केला जात नसावा ना अशी शंका हि यावेळी दत्तात्रय साळुंखे यांनी उपस्थित केली.
तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा पाटील यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठवून निधी वाटपात अन्याय झाल्याची तक्रार केली होती.त्यामध्ये पालकमंत्री सावंत यांच्या मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाटप केंद्रीत झाला आहे. इतर तालुक्यांना असमतोल निधी वाटप झाला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्यांनतर राज्याच्या उपसचिवांनी राणा पाटील यांच्या पत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांना खुलासा मागितला होता. पाटील यांनी त्यांच्या पत्रासोबत निधी वाटपाचे एक पान जोडले होते. त्यावर कुणाचीच सही नाही,मग ते जोडलेलं पान कशावरून खरं आहे ? असा सवाल उपस्थित केला.
उस्मानाबादसाठी 3722.50 लाखांचा निधी मंजूर
जिल्हाधिकाऱ्यांनी खुद्द पालकमंत्र्यांनी निधी वाटपासाठी दिलेल्या आदेशाचे पत्र सविस्तर आकडेवारीसह प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपंचायत य नगरपरिषदेच्या योजनेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 3722.50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुळजापूर मतदारसंघासाठी 585.60 लाख रुपये तर भूम, परंडा, याशी मतदारसंघासाठी 656.46 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा वार्षिक योजनेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 15032.14 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 30 टक्के निधी म्हणजेच 4509.64 लाख हा पालकमंत्र्यासाठी राखीव असतो. त्यामध्ये तुळजापूर मतदारसंघासाठी 2705.79 लाख रुपये तर भूम, परंडा, वाशी मतदारसंघासाठी 2555.46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तुळजापूर मतदारसंघासाठी जादा निधी मंजूर करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून आरोप केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले.
राणा पाटील यांचा बोलवता धनी कोण?
वस्तविक पाहता गेली 35 वर्षे राणा पाटील यांचे वडीलच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कधीच जनतेचा विचार केला नाही, मात्र दुसऱ्यावर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केल्याने त्यांना नक्की राष्ट्रवादी की भाजप नेत्यांकडून फूस लावली जात आहे. त्यासोबतच त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे जनतेपुढे आले पाहिजे, अशी मागणी दत्तात्रय सालुंखे यांनी पुढे केली.Rana Patil’s allegations are baseless
ML/KA/PGB
2 Mar. 2023