विधानपरिषदेत नवीन गटनेते जाहीर
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत काँग्रेसच्या गटनेते पदी सतेज पाटील यांची तर काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपाच्या गटनेतेपदी प्रवीण दरेकर , मुख्य प्रतोदपदी भाई गिरकर आणि प्रतोदपदी प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आल्याचं उपसभापती नीलम गोर्हे यांनी आज सभागृहात जाहीर केलं.
ML/KA/SL
2 MARCH 2023