स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकात अभिवादन…

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादरच्या राष्ट्रीय स्मारकात जाऊन त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या चित्रांच्या प्रदर्शनालाही त्यांनी यावेळी भेट दिली. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, संजय चेंदवणकर, शिवसेनेच्या पदाधिकारी ज्योती भोसले आणि शिवसैनिक आदी यावेळी उपस्थित होते. त्यांनी स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सावरकरांचे विचार नेहमीच प्रेरणादायी ठरतील असे त्या म्हणाल्या.
“महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रचलित शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रचलित केले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रखर राष्ट्र प्रेम, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि मराठी भाषा आणि लिपी शुद्धी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले काम अजरामर आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यांचे असलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. भाषेतील अनेक नवीन शब्द, सुधारणासाठी त्यांनी काम केले . त्यांच्या या योगदानाचे स्मरण म्हणून विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे…. ” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.Freedom hero Vinayak Damodar Savarkar
ML/KA/PGB
26 Feb. 2023