अक्षय कुमार सोडणार कॅनडाचे नागरिकत्व
मुंबई,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनडाच्या नागरिकत्वावरून नेहमी वादात सापडणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता कॅनडाचे नागरिकत्व सोडणार आहे.
अक्षयचा ‘सेल्फी’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. याचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्यावर म्हटलं आहे.
अक्षय कुमार म्हणाला, “भारत माझ्यासाठी सर्व काही आहे. मी जे काही कमावले आहे, मी जे काही मिळवले ते येथील आहे. मी भाग्यवान आहे की, मला परत देण्याची संधी मिळते. कधी कधी वाईट वाटते जेव्हा लोक नकळत काहीही गोष्टी बोलतात. 90 च्या दशकात माझे चित्रपट चालत नव्हते. 15 हून अधिक चित्रपट फ्लॉप झाले होते. पण काम तर करावे लागणार होते. मी कामासाठी कॅनडामध्ये गेलो. कामानिमित्त मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर मी पुन्हा भारतात आलो आणि काम करायला सुरुवात केली. त्यानंतर माझे अनेक सिनेमे सुपरहिट झाले. माझ्याकडे कॅनडाचा पोसपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. पण आता मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज दाखल केला आहे”.
SL/KA/SL
24 Feb. 2023