अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
बीड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम गु.र.नं. ३० / २०२१, कलम ३७६ (२) (फ) (एल), ३५४,३५२ भा.द.वि.सह कलम ९२ अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता याप्रकरणाची सुनावणी अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आज झाली असता आरोपीला २५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती संजश्री. जे. घरत यांनी दिलीय.Historical Judgment of Ambajogai District and Sessions Court
ML/KA/PGB
24 Feb. 2023