नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन पर्यावरणपूरक बनविली सोसायटी

 नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन पर्यावरणपूरक बनविली सोसायटी

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुणे शहराच्या विकासाची गती पाहता पुण्याकडे अनेकांची रोजगाराकरता पावले वळत आहे. येणा-या नागरिकांना घरांची गरजही तितकीच महत्वाची आहे.त्यामुळे बांधकामेही मोठया प्रमाणात इथं सुरु आहेत.

पण पर्यावरणपूरक बांधकामे याठिकाणी कमी पाहायला मिळतात. 2016 मध्ये दत्तनगर येथील आँलिव्ह गृहनिर्माण सोसायटी मधील राहणारे पराग शहा यांनी सौर उर्जैवर आधारीत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव इथ राहणा-या नागरिकांपुढे ठेवला .याचा सर्वअंगाने अभ्यास केल्यानतंर नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.Society made environment friendly by using natural resources

काय झालं नेमकं

सोसायटी मधील रोडवरी लाईट,काँमन जागेसह ,दहा लिफ्ट,पाण्याचे पंप याकरता या सौर ऊर्जैचा वापर करण्याचे निश्चित केले गेेले. आणि त्यानुसार कामाला सुरवात झाली. याकरता 33 लाख रुपये खर्च करुन पहिल्या टप्यात 50 के डब्ल्युचा सौर पँनेल ए,बी विंगच्या टेरेसवर बसविण्यात आले. आज याचा फायदा इथल्या नागरिकांना होत आहे.

2016 पुर्वी त्यांना महिन्याला 1 लाख 50 हजार इतके वीज बिल येत होते आता यात 95 टक्के इतकी कपात झाली आहे.यामुळे इथ राहणारे रहिवाशी सुध्दा आता आनंदित आहेत.

विशेष म्हणजे महावितरणच्या सौरऊर्जा ग्रीडला या सौरऊर्जैतून अधिकची निर्माण होणारी वीज जोडली गेली असून साधारपणे पावसाळ्यात सोसायटीच्या सौर प्रकल्पातून वीज कमी मिळते. तेव्हा या ग्रीडमधून वीजेचा वापर इथे केला जातो.

दिवसेदिवस या प्रकल्पाच्या माध्यमातून आता नवी पावले उचलण्याचा निर्धार सोसायटी मधील नागरिकांनी केला आहे. यात आता इलेक्ट्रिक वाहनाकरता सौर ऊर्जेची वीज वापरली जाणार असून त्यादृष्टीने आता चार्जींग स्टेशन तयार करण्यात आली आहे. तसेच सोसायटी कच-यापासुन खत निर्मिती,रेन वाँटर हार्वैस्टिंग ही असून याठिकाणी बारामाही पाणी उपलब्ध आहे. अशा या पर्यावरणपुरक सोसायटीला विविध स्तरातून गौरविण्यात आले आहे.

ML/KA/PGB
15 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *