दास नवमिनिमित्त धार्मिक कार्यक्रम
नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी यांच्या 341 व्या पुण्यतिथी म्हणजेच दास नवमी निमित्त समर्थ रामदास स्वामी यांनी नाशिक जवळील टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमावर स्थापन केलेल्या मठात असणाऱ्या गोमय मारुती मंदिरामध्ये महापूजा आणि अन्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम साजरे करून दासनवमी आज साजरी करण्यात येत आली.Religious program for Das Navami
या वेळी दर्शनासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे राष्ट्रभक्ती आणि परकीय मोगली आक्रमणाविरुद्ध जनतेमध्ये धर्माच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी बल आणि तप उपासनेचे महत्त्व तरुणांना पटविण्यासाठी समर्थ रामदासांनी देशभर स्थापन केलेल्या हनुमान मंदिरांपैकी गोमय हनुमानाचे हे प्रमुख मंदिर आहे.
वयाच्या बाराव्या वर्षी लग्नप्रसंगी गृहस्थाश्रमामध्ये न अडकण्याचे निर्णय घेऊन बोहल्यावरून पलायन केल्यानंतर रामदास स्वामी थेट गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमावरील नाशिक जवळच्या टाकळी गावात आले , या ठिकाणी गोमय हनुमानची आणि मठाची स्थापना केली या ठिकाणी भारत भ्रमणाला जाण्यापूर्वी रामदास स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य आणि तपश्चर्या केली.
या मठामध्ये समर्थ रामदासांनी स्वस्ताक्षरांमध्ये रामायणाची पाच कांड लिहलेली गुहा टाकळी मठाने जशीच्या तशी अद्यापही संरक्षित केली आहे . या गुहेमध्ये असणाऱ्या श्रीरामाच्या मूर्ती पुढे नतमस्तक होण्यासाठी आणि जप अनुष्ठान करण्यासाठी नागरिक आज मंदिरात गर्दी करीत आहेत.
गाईचे शेण, गोमूत्र, शेणाच्या गोऱ्यांची राख यांच्यापासून हनुमानाची मूर्ती करण्यात आली ही मूर्ती ही संरक्षित करण्यात आली असून अद्यापही या ठिकाणी विराजमान आहे सकाळी सात वाजेपासून मंदिरामध्ये महापूजा होम हवन याचबरोबर दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मनाचे श्लोक भक्ती गीते यांचे गायन प्रवचन आधी धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद मंदिरामध्ये सुरू होते.
ML/KA/PGB
15 Feb. 2023