जुहूमध्ये ई सिगारेटचा साठा जप्त

 जुहूमध्ये ई सिगारेटचा साठा जप्त

मुंबई दि.14( एम एमसी न्यूज नेटवर्क) : शाळा परिसरात प्रतिबंधीत ई-सिगारेट विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापेमारी करून गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी शाखेने दोघांना अटक केली आहे. अहमद अब्दुल वहाब शहाल (22) व उमर फारूख जुबेर आदम (45)अशी या दोघांची नावे असून त्यांच्या कडून सुमारे 5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या ई-सिगारेट व विदेशी बनावटी सिगारेट सांताक्रूझ येथील जुहू परिसरातील वेगवेगळया ठिकाणी अनधिकृत साठा वितरण व विक्री करीता ठेवण्यात आला आहे,अशी माहिती गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी शाखेला मिळाली होती.

त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पोलीस अपर पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जुहू पोलीस ठाणे हद्दीतील तारा रोड व जूहु चर्च रोड येथील विजय पानविडी शॉप व दि स्मोक शॉप या दोन दुकानावर छापा टाकला.

या छाप्यात भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या 4 लाख 45 हजार रुपयेचा ई सिगारेट,96 हजार रुपयांचा विदेशी बनावटी सिगारेट व 7 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात कलम 7, 8 इलेक्ट्रीक सिगारेट (उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक व जाहिरात) प्रतिबंध अधिनियम 2019 सह कलम 7 (2) (3) आणि 20 (2) सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरातीस प्रतिबंध आणि वाणिज्य आणि व्यापार निर्मिती पुरवठा, वितरण) अधिनियम 2003 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर गुन्ह्यात पान टपरी चालक अहमद अब्दुल वहाब शहाल व उमर फारूख जुबेर आदम या दोघांना अटक केली आहे.

SW/KA/SL

14 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *