श्री क्षेत्र पोहरादेवीला उसळला जनसागर
वाशिम दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सकल बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वाशीम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ३२६.२४ कोटीच्या विकास कामांचे भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, दादा भुसे, खासदार भावना गवळी व बंजारा समाजातील संत महंतांची उपस्थिती होती. दरम्यान संत सेवालाल महाराज यांच्या पंच धातुजडीत पुतळा व १३५ फूट उंची असलेल्या सेवाध्वजाचे अनावरण यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले.
यानिमित्त पोहरादेवी येथे लाखोंच्या संख्येने बंजारा बांधवांची उपस्थिती होती. मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजातील काही प्रमुख मागण्यांची प्रस्तुती आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून केली.
पोहरादेवी हे संपूर्ण भटक्या समाजाची काशी असून आगामी काळात पोहरादेवी आणि बंजारा समाजाच्या शैक्षणिक, व्यावसायिक, सांस्कृतीक विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनातून केले.
ML/KA/SL
12 Feb. 2023
 
                             
                                     
                                    