शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

 शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

रत्नागिरी, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.25 lakhs help to Shashikant Warise’s family

आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही सामंत यांनी स्वीकारली आहे.

ML/KA/PGB
12 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *