‘दगडूशेठ’ गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक

 ‘दगडूशेठ’ गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक

पुणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीं च्या मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे पडली आणि जय गणेश… चा एकच जयघोष झाला.

किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.Mahabhishek of sun rays to ‘Dagdusheth’ Ganapati

भाविकांनी अनुभवला सोहळा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणे स्नान घालत असल्याचा भास होत होता. सकाळी ८ वाजून १८ मिनीटे ते ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा अनुभवता आला.माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो. गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला.

ML/KA/PGB
12 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *