महाराष्ट्राला लाभले नवे राज्यपाल
नवी दिल्ली,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल नियुक्ती केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी याआधी त्रिपुरा आणि झारखंडच्या राजपालपदाची
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला आहे.
कोश्यारी हटावची मागणी
भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडले होते. त्यामुळे त्यांना राज्यपालपदावरून हटवावे अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात होती. राज्यपाल हटवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठ्या मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं होतं. परिणामी सत्ताधारी भाजपची चांगलीच राजकीय कोंडी झाली होती. काही दिवसांनी महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल अभिभाषण करत असतात. यावेळी विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर भाजपने सावधगिरी बाळगत आता कोश्यारींना हटवून नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत.
नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या विषयी
- रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे.
- सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
- २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आलं होतं. त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती.
- आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.
ML/KA/SL
12 Feb. 2023