आज आम आदमी पार्टीचे आंदोलन
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंडनबर्गच्या रिपोर्ट नंतर अदानी समूहाने केलेला गैरव्यवहार जगासमोर आल्यानंतर सुद्धा केंद्रातील भाजप सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने उद्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकार विरोधात चर्चगेट स्टेशन ते नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्ग च्या रिओपर्ट नंतर अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांचे काळे कारनामे संपूर्ण जगासमोर आल्यानंतर सुद्धा केंद्रातील भाजप सरकार आणि त्यांच्या नियामक संस्थांनी अदानी यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली नाही. म्हणून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसार आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर राष्ट्रव्यापी आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्
आम आम आदमी पार्टी मुंबई तर्फे उद्या चर्चगेट स्टेशन ते नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे.Aam Aadmi Party movement today
या मोर्चात आम आदमी पार्टी मुंबई अध्यक्ष
प्रीती शर्मा – मेनन,कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस, यांच्यासह आम आदमी पार्टीचे मुंबईतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
ML/KA/PGB
11 Feb. 2023