पंतप्रधानांनी मुंबईत केलं दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चे लोकार्पण

 पंतप्रधानांनी मुंबईत केलं दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चे लोकार्पण

मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज संध्याकाळी मुंबई येथे आगमन झाले. यावेळी विमानतलावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी त्यांनी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर  या दोन ‘वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पण कार्यक्रमात मराठीतून भाषण केले. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. असे पंतप्रधानांनी मराठीत भाषणाला सुरुवातीला सांगितले.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला.

यानंतर पंतप्रधानांनी मुंबईतील मरोळ येथे बोहरा मुस्लीम समुदायाच्या अलजेमा-तूस-सैफी या संकुलाचं उद्घाटन केलं. तसेच बोहरा समुदायाविषयीच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. नरेंद्र मोदी म्हणाले, “बोहरी समाजाच्या कार्यक्रमात येणं माझ्यासाठी कुटुंबात आल्यासारखं आहे. मी तुम्ही तयार केलेली चित्रफीत पाहिली. माझी एक तक्रार आहे आणि मला वाटतं त्यात सुधारणा केली पाहिजे. तुम्ही त्या चित्रफितीत वारंवार माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मी इथं पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही.”

“मला जेव्हा जेव्हा बोहरी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा मला खूप आनंद झाला. दाऊदी समाजाने काळाच्या कसोटीवर कायम स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे उद्घाटन झालेलं हे संकुल,” असंही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना नमुद केलं.

SL/KA/SL

10 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *