विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पवना परिसराला हिरवी शाल पांघरून वसुंधरा रक्षण करणारे व पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी पवना शिक्षण संकुलाने निर्माण करावेत, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात आयोजित वृक्षारोपण समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, वनसंरक्षक राहुल पाटील, पवना मालमत्ता संघटनेचे अध्यक्ष पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ, पवना शिक्षण संकुलाचे सचिव संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगलमे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी देशाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करून आई-वडिलांची सेवा करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी विद्यार्थ्यांनीही आपले योगदान दिले पाहिजे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना सांस्कृतिक शिक्षण दिले पाहिजे.Students should also contribute to environment protection: Forest Minister Sudhir Mungantiwar
ML/KA/PGB
9 Feb. 2023