नाराज झालेला राहुल द्रविड कसोटी सामना करणार रद्द?

 नाराज झालेला राहुल द्रविड कसोटी सामना करणार रद्द?

नागपूर,दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे ९ फेब्रुवारी पासून नागपुरमध्ये  भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेतील  पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड खेळपट्टीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाणार असून आयोजक तयारी करत आहेत.

 मिडिया रिपोर्टनुसार राहुल द्रविडने सामन्यासाठी दुसऱी खेळपट्टी निवडली आहे. क्युरेटर्स आता ही खेळपट्टी तयार करत आहेत. व्यवस्थापन पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीला महत्त्व देत असल्याचे समजते.

गांगुली ही होता नागपूरच्या पिचवर नाराज

नागपूरमधील जमाथा स्टेडिअममध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. याआधी 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने याच मैदानावर भारताचा पराभव केला होता. त्यावेळी कर्णधार सौरव गांगुलीने खेळपट्टीवर गवत असल्याने नाराजी जाहीर केली होती आणि सामन्यातून माघार घेतली होती.

भारतीय संघाचा सातत्यपूर्ण विजय

दरम्यान सध्या भारतीय क्रिकेट संघ  घरच्या मैदानावर तुफान कामगिरी करत आहे.  त्यामुळे भारताला पराभूत करणं कोणत्याही संघासाठी सोप्पं  नाहीय.  भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये भारताची यशस्वी घोडदौ़ड कायम रहावी यासाठीच प्रशिक्षक राहुल द्रविडचा  उत्तम खेळपट्टीचा आग्रह आहे.

 

SL/KA/SL

7 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *