Chat GPT ला टक्कर देणार Google AI
मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चॅट जीपीटीने बाजारात कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली असून ते टूल इतके प्रसिद्ध झाले की गुगल आणि चॅट जीपीटीची तुलना होऊ लागली होती. यामुळेच ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जोडणार आहे. कंपनी ८ फेब्रुवारीला सर्च आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित एका कार्यक्रमात याची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चॅट जीपीटी हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचे पूर्ण नाव Generative Pretrained Transformer आहे. तुम्ही याला आधुनिक न्यूरल नेटवर्क आधारित मशीन लर्निंग मॉडेल (Neural network based machine learning model) असेही म्हणू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रमाणे रिअल टाईम सर्च तर देतेच शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अगदी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात देतं.
या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर भाष्य केले होते. पिचाई म्हणाले होते की, लवकरच लोक सर्वात शक्तिशाली मॉडेलच्या मदतीने शोध घेऊ शकतील. त्यावर काम सुरू असून लोकांना लवकरच हा अनुभव घेता येईल.
The Verge च्या रिपोर्टनुसार, गुगल ८ फेब्रुवारी रोजी सर्च आणि AI शी संबंधित कार्यक्रम आयोजित करणार आहे. या रिपोर्टमध्ये या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशनही शेअर करण्यात आलं आहे. ज्यात माहिती देण्यात आली आहे की, या पॉवरफुल AI च्या मदतीने लोक जलद गतीने कोणतीही गोष्ट सर्च करून काही सेकंदातच हवी असलेली माहिती मिळू शकतात. The Verge मध्ये पाठवण्यात आलेल्या इन्व्हिटेशननुसार, 40 मिनिटांचा हा कार्यक्रम 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ET (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजत ) YouTube वर प्रसारित केला जाईल.
TM/KA/SL
6 Feb. 2023