पंतप्रधानांच्या दौरा काळात या साधनांच्या उड्डाणास बंदी
मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत येत आहेत.यानिमित्ताने मुंबई एअरपोर्ट, आयएनएस शिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळ, अंधेरी या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे.
या साधनांच्या वापरावर बंदी
ड्रोन आणि छोट्या विमानाने दहशतवादी हल्ला करू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय आकाशात ड्रोन, पॅरा ग्लायडर किंवा रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या दौऱ्याच्यावेळी दहशतवादी,समाजविरोधी घटकाकडून या साधनांचा वापर झाल्यास मानवी जीवन आरोग्य सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई
परिणामी, मुंबई पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी विमानतळ , सहार , कुलाबा, माता रमाबाई मार्ग , एमआयडीसी व अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोनसह आकाशात कोणतीही वस्तू उडवण्यास बंदी केली आहे.
ही बंदी 1 ते रात्री १२ वाजेपर्यंत राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी आदेशात म्हटले आहे.
SW/KA/SL
6 Feb. 2023