विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
वर्धा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विद्रोही साहित्य संस्कृती विचार यात्रेला शिवाजी चौक येथून आज सुरुवात करण्यात आली.
17 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन आज आणि उद्या वर्धा येथील सर्कस मैदानात
करण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने आज सकाळी 9-30 वाजता ‘विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रा’ काढण्यात आली.Rebel Marathi Literary Conference begins
यात्रेत काय
या यात्रेमध्ये प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध नृत्य प्रकार, बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लेझीम पथक आदिवासी व्यक्ती यांचे वेशभूषा परिधान केलेले शाळा कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी झाले.
या यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झाली.शहरातील मुख्य मार्गाने मार्गाने मार्गक्रमण करीत सर्कस ग्रॉऊंड येथील संमेलन स्थळी या यात्रेचा समारोप झाला .
ML/KA/PGB
4 Feb. 2023