पोटनिवणुकीसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकी बाबत महाविकास आघाडीचा निर्णय उद्या घेण्यात येईल असे स्पष्टीकरण आघाडीच्या नेत्यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिले.
आघाडीच्या नेत्यांची याबाबत आज एक बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते छगन भुजबळ, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
आमची बैठक आज झाली , आमच्या आणखी मित्र पक्षांशी बोलून उद्या याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. देगलूर, कोल्हापूर , पंढरपूर येथील पोटनिडणुकीत आम्हाला बिनविरोध निवडून देण्यात आले नाही , त्यावेळी साधनशुचीता भाजपाला का आठवली नाही असा सवाल जयंत पाटील यांनी यावेळी केला.
धनशक्तीचा वापर , जनता आमच्या पाठीशी
नुकत्याच झालेल्या विधानरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत राज्यातील जनता आमच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे, कोकण शिक्षक मतदारसंघात मात्र धन शक्तीचा वापर झाला असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. कोकण आणि नाशिक येथील आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आघाडीच्या उमेदवारालाच मदत केली असेही ते म्हणाले.
ML/KA/SL