राज्यातील पहिला तृतीयपंथी रुग्णांसाठीचा विशेष कक्ष सुरु …

 राज्यातील पहिला तृतीयपंथी रुग्णांसाठीचा विशेष कक्ष सुरु …

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तृतीयपंथी रुग्णा साठीच्या विशेष कक्षाचे उदघाटन आज मुंबईत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते गोकुळदास तेजपाल रुग्णालयात करण्यात आले.

या कक्षात 30 खाटा असून या रुग्णांच्या भर्ती बाबत आणि उपचार पद्धती बाबत विशिष्ट नियम कारण्यात आले आहेत. या कक्षाच्या उपयोगतेस लक्षात घेऊन सदर कक्षा प्रमाणे राज्यभर प्रत्येक शासकीय रुग्णालयात काही खाट राखीव करण्यात येतील अशी माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

तृतीय पंथी समाजाचेच घटक

हे ही आपलेच घटक आहेत. त्यांच्या अडचणी लक्षत घेऊनच शासनाने हे पाऊल उचलले आहे. मोदीजींची संदेश आहे सबका साथ सबका विकास. मोदीजींनी पाच लाखाचा विमा गरीब नागरिकांना देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे याची आठवण महाजन यांनी करून दिली.

या प्रसंगी व्यसनोपचार केंद्राचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.तसेच तृतीयपंथी रुग्णासाठीच्या sop मार्गदर्शन पुस्तिकाचे प्रकाशन ही करण्यात आले.

या प्रसंगी जे जे समूह रुग्णालयच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन राजीव निवतकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन डॉ दिलीप म्हैसेकर, अधीक्षक डॉ भालचंद्र चिखलकर, तृतीय पंथी प्रतिनिधी गौरी सावंत आणि इतर उपस्थित होते.

ML/KA/SL

3 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *