महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

 महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

अमरावती, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा 3382 मतांनी पराभव केला.

काल सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, परंतु उमेदवारास विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीचा आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्याबद्दल रात्री उशिरा दुसर्‍या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. मतांचा कोटा पूर्ण केल्याबद्दल धीरज लिंगाडे यांना आज विजयी घोषित करण्यात आले.

मतदान किती झाले

अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत 49.67 टक्के म्हणजे 102587 मतदान झाले होते त्यापैकी 94200 मते वैध तर 8387 मते अवैध ठरली.

महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना एकूण 46344 मते तर डॉ रणजित पाटील यांना एकूण 42962 मते मिळाली.30 तास चाललेल्या मतमोजणी नंतर अखेर निवडणुक निरीक्षक पंकजकुमार व विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

लिंगाडे यांचे प्राधान्य काय

जुनी पेन्शन योजना निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी सांगितले.

ML/KA/SL

3 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *