तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाचा समारोप

 तिसऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाचा समारोप

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत सरकारच्या वतीने 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान राजधानी दिल्ली, गुजरात आणि  मुंबई येथे तिसरा इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  हा युवा पोलिस नेत्यांसाठी एक महत्वाकांक्षी इंटरपोल नेतृत्व कार्यक्रम  होता.

इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाच्या समारोप सत्राला सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी मुंबईत संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक व्याप्ती असलेल्या गुन्हेगारीसंदर्भात पोलिस संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. आपल्या भाषणात, त्यांनी पोलिस दलाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांना नम्रता आणि व्यापक आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन असलेले नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले.

44 देशांतील 59 प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय पोलिस लिडर्सच्या पुढच्या पिढीला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आणि वैश्विक आकलन या दृष्टीने एकत्र आणणे आणि त्यांना सक्षम बनवणे हा यामागचा उद्देश होता.

या नऊ दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान, सहभागी झालेल्यांना भारतीय पोलिसांची समृद्ध व्यावसायिक क्षमता, नवोन्मेष आणि त्यांनी विकसित केलेल्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्यात आली.

भारतातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, जागतिक स्तरावरील या युवा  पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली; राष्ट्रीय पोलीस स्मारकावर श्रद्धांजली वाहिली; सीबीआय मुख्यालय, ग्लोबल ऑपरेशन्स सेंटर, दिल्ली पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार, विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा), केंद्रीय गृह मंत्रालय;  सीबीआय संचालक आणि सीबीआयचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी  संवाद साधला.

इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाच्या समारोप सत्राला सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी मुंबईत संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक व्याप्ती असलेल्या गुन्हेगारीसंदर्भात पोलिस संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. आपल्या भाषणात, त्यांनी पोलिस दलाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांना नम्रता आणि व्यापक आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन असलेले नेतृत्व गुण आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले.

आंतरराष्ट्रीय आणि गुंतागुंतीच्या वाढत्या गुन्ह्यांचा सामना करताना, अधिकार क्षेत्र आणि प्रशिक्षण यामधील भागीदारी हे पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण साधन ठरेल. या पार्श्वभूमीवर, जागतिक गुन्ह्यांच्या  तपासामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि/किंवा टिकवून ठेवण्यासाठी संकल्पनांची ओळख, विश्लेषण, कल्पना करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व आणि याचे प्रवर्तक म्हणून तसेच जागतिक जाळे उभारण्यातली इंटरपोलची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

SL/KA/SL

3 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *