कल्याण- मुरबाड रेल्वेमार्गाला केंद्राकडून मान्यता

 कल्याण- मुरबाड रेल्वेमार्गाला केंद्राकडून मान्यता

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  गेल्या 30  वर्षांपासून रखडलेल्‍या महत्त्‍वपूर्ण कल्याण-मुरबाड रेल्वेच्या कामाला अखेर केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. एकूण ९६० कोटींचा अपेक्षित खर्च असलेल्या या प्रकल्पाचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार मिळून करणार आहेत.

मुरबाडकरांच्या स्वप्नातल्या रेल्वे प्रकल्पाचे काम कागदावरून प्रत्यक्षात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा रेल्वे मार्ग झाल्यास मुरबाड तालुकाही मुंबईशी जोडला जाणार असून, येथील कष्टकरी शेतकरी (farmers) आणि नोकरदारांना रोज दळणवळणासाठी करावी लागणारी कसरत थांबण्यास मदत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या लगत असलेले  कल्याण, शहापूर, कर्जत आणि अंबरनाथ हे चारही  तालुके रेल्वेने जोडले गेले आहेत; मात्र मुरबाड स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रेल्वेपासून वंचित राहिला आहे. परिणामी, येथील रहिवाशांना आजही दळणवळणासाठी एसटीवरच अवलंबून राहावे लागते; मात्र अपुऱ्या सेवेमुळे शेकडो प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून काळ्या-पिवळ्या जीपमधून प्रवास करावा लागतो.

प्रवासी व मालवाहतूक करण्याची साधने कमी पडत असल्याने तालुक्यातील शेतकरी व आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि तालुक्यात पिकणारा रानमेवा कमी भावाने विकावा लागतो. त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून कल्याण- मुरबाड रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने नोकरदार  व शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

SL/KA/SL

2 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *