मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते), कार्यवाहपदी ‘टुडे रायगड’चे पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत १५९ सदस्यांनी मतदान केले. अध्यक्षपदासाठी प्रमोद डोईफोडे आणि राजा अदाटे यांच्यात लढत झाली. प्रमोद डोईफोडे हे ७८ मते मिळवून विजयी झाले.
कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे पत्रकार विनोद यादव हे ६७ मतांनी निवडून आले. कार्यकारीणीवर दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’ चे पत्रकार अलोक देशपांडे (७१मते), दैनिक ‘लोकमत’ चे पत्रकार मनोज मोघे (६८मते), ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी (६१ मते), दै. ‘नवाकाळ’ चे पत्रकार खंडूराज गायकवाड (५९ मते), दै. ‘डेक्कन क्रॉनिकल’चे भगवान परब (५८ मते) निवडून आले. प्रती दोन वर्षांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते.
ML/KA/SL
31 Jan. 2023