नव्या मुंबईत पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरची सुरुवात

 नव्या मुंबईत पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरची सुरुवात

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दि वेब वर्क्स – आयर्न माऊंटेन डेटा सेंटर्स (आयएमडीसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून आज त्यांच्या पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरच्या उद्घाटनाची नवी मुंबईत – एमयूएम२ च्या करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आयर्न माऊंटेन ने वेब वर्क्स बरोबर सहकार्य करार केल्याची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती.

नवी मुंबईतील रबाळे येथे असलेल्या या केंद्राचे उद्घाटन आयर्न माऊंटेन चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम एल मीनीमीने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.  यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये वेब वर्क्स आणि आयर्न माऊंटेन च्या जागतिक टिम्स, भागीदार आणि विविध मान्यवर सरकारी अधिकारी यांचा समावेश होता.

१ लाख २० हजार चौरस फूटांवर असलेल्या या डेटा सेंटरची बांधणी ही कोविड-१९ सह जागतिक स्तरावरील अडचणींवर मात करत घोषणा केल्यापासून केवळ १८ महिन्यांमध्ये करण्यात आली आहे.  एमयूएम-२ डेटा सेंटर हे तळमजल्या सह ५ मजल्यांवर असून १० एमव्हीए उर्जेचा उपयोग करते.  टिअर ३ डेसिग्नेटेड डेटा सेंटर वेब वर्क्सच्या नवी मुंबईतील मुंबई १ डीसी जवळ असल्यामुळे ग्राहकांना आता त्यांच्या सक्षम अशा इंटरनकनेक्शन पध्दतींचा वापर करण्याचा लाभ घेता येणार आहे.  या डेटा सेंटर मुळे टिअर१ कॅरिअर्स , २०० हून अधिक आयएसपीज, भारतातील सर्वांत मोठ्या पिअरींग एक्सचेंजेस सह विशाल अशा हायपरस्केल क्लाऊड प्रोव्हायडर्स ना क्लाऊड ऑन रँम्प चा लाभ घेणे शक्य होणार आहे.

वेब वर्क्स चे सीईओ निखिल राठी यांनी सांगितले “ नवी मुंबईतील दुसर्‍या डेटा सेंटरची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे.  मुंबईतील आमचे सध्याचे डेटा सेंटर हे जवळजवळ सर्वच भाड्याच्या जागेतील आहे आणि विविध ग्राहक विभागात आमच्या सेवांची मागणी वाढेल असे दिसून येते.  ही मागणी विशेष करुन वाढते डिजिटायझेशन, भारतात ५ जी नेटवर्कची सुरुवात आणि क्लाऊडचा अधिक वापर यामुळे वाढणार आहे.  या नवीन डेटा सेंटर मुळे तसेच क्षेत्रातील दिग्गज यांच्या मुळे आम्ही ही वाढती मागणी पूर्ण करु शकू आणि कनेक्टिव्हिटी ने समृध्द पध्दती उपलब्ध करुन देऊ शकू.”

“आयर्न माउंटन आणि वेब वर्क्सचे पहिले ग्रीनफिल्ड डेटा सेंटर उघडणे हे भारतातील आघाडीच्या डेटा सेंटर पुरवठादारांपैकी एक म्हणून आमच्या संयुक्त उपक्रमाचे स्थान वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.” आयर्न माऊंटेन चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम मीनी मीने यांनी सांगितले “ या नवीन केंद्रातील गुंतवणूक म्हणजे आमच्या एपीपएसी क्षेत्रातील हायपरस्केल, नेटवर्क, कंटेंट आणि एन्टरप्राईज ग्राहकांना सक्षम जोडणीने युक्त, सुरक्षित आणि समावेशक डेटा सेंटर्स देण्याच्या आमच्या वचनबध्दतेला अधोरेखित करत आहे.”Inauguration of the first green field data center in New Mumbai

या आधीच वेबवर्क्स ने कर्नाटक आणि तमिळनाडू सरकार बरोबर सहकार्य करुन बंगलोर आणि हैद्राबाद मध्ये डेटा सेंटर्स उभारणार असल्याची घोषणा केली आहे.  या स्वतंत्र अशा डेटा सेंटर्स चे बांधकाम पूर्ण होत आले आहे आणि डेटा हॉल्स हे २०२३  पहिल्या सहामाहीत कार्यान्वित होतील.  २०२२ मध्ये वेब वर्क्स ने उत्तर प्रदेश मधील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट च्या भूमीपूजन समारंभात सहभागी होऊन नॉयडा येथील हायपरस्केल डेटा सेंटर मध्ये गुंतवणूक करत असल्यची घोषणा केली आहे.  वेबवर्क्स- आयर्न माऊंटेन डेटा सेंटर्स यांच्या भागीदारीतून मुंबई, पुणे, नॉयडा यासारख्या सध्याच्या क्षेत्रात वाढ करण्या बरोबरच चेन्नई सारख्या नवीन बाजारपेठेतही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

ML/KA/PGB
31 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *