भिवंडीतील खाडीपार येथे इमारतीचा भाग कोसळला ; एकाचा मृत्यू
भिवंडी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भिवंडी शहरातील धोकादायक इमारत दुर्घटनांचा प्रश्न जटील असताना शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपाडी या भागात रस्त्यालगत असलेल्या मूलचंद कंपाऊंड येथे एका दोन मजली इमारतीचा पुढील काही भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकास सुखरूप बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.माजीद अंसारी वय ३५ वर्ष असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत तर अशरफ नागोरी वय २२ वर्ष असे इमारत ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे.Part of building collapsed at Khadipar in Bhiwandi; death of one
इमारती लगत रस्त्याच्या कडेला आठ दुकानांचे गाळे बनवण्यात आले होते.या दुकानांवरील इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली असून यावेळी कपड्याचे दुकान असलेल्या गाळ्यामध्ये दुकानचालक माजीद अंसारी हा झोपलेला असल्याने त्यावर इमारतीचा ढिगारा कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळतात भिवंडी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ढिगारा उपसून त्यामध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात रवाना केला.तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अशरफ नागोरी याला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले असून तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर शोध कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
विशेष म्हणजे या इमारती लगत असलेल्या जागेत हे गाळे बांधकाम लोड बेअरिंग पद्धतीने स्लॅब टाकून बनविण्यात आले होते.त्यावरील भागात मागील वर्षी आग लागली होती .त्यामुळे इमारतीचा हा भाग कमकुवत झाला असल्याची माहिती मिळत आहे.
ML/KA/PGB
27 Jan. 2023