ऐन हिवाळ्यात गारपीट आणि वादळी पाऊस

 ऐन हिवाळ्यात गारपीट आणि वादळी पाऊस

अहमदनगर, दि. २५  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  ऐन हिवाळयात राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळासह गारपिट झाली. या वादळ आणि गारपिटीत गहू, हरभरा, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.

सुमारे अर्धा तास गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे निसावून उभा असणारे गव्हाचे पिक भूईसपाट झाले. आधीच परतीच्या पावसाने या भागातील खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असतांना त्याची भरपाई शेतकरच्या पदरी पडलेली नसतांना आता पुन्हा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

शेतकरी आता आसमानी संकटापुढे हतबल झाला आहे. शासनाने झालेल्या गारपीटीचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ML/KA/SL

25 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *