“साडेतीन शक्तिपीठे ” महाराष्ट्राच्या चित्ररथावर

 “साडेतीन शक्तिपीठे ” महाराष्ट्राच्या चित्ररथावर

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.

येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणा-या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची 10 अशी एकूण 27 चित्ररथे कर्तव्यपथावर झळकणार आहेत. यंदा महाराष्ट्रातर्फे ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ विषयावर आधारित चित्ररथ आहे.

महाराष्ट्र राज्याचे यापूर्वी 40 वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर झालेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ आहे. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

महाराष्ट्र संताची आणि देवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात महत्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्ध शक्त‍िपीठ आहे. या शक्तिर्पीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे.“Three and a half Shaktipeeths” on Chitraratha of Maharashtra

चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी , गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा आहेत. यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती दिसणार. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत.

चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दिसणार आहे. अशी माहिती चवरे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” असे गीत संगीतबध्द गेय रूपात ऐकू येणार आहे.

यासोबतच कर्तव्यपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. शुभ ऍड ही संस्था चित्ररथाचे काम करीत असून त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य कलाकारांचा चमू करीत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे व्हीजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील आहेत.

ML/KA/PGB
22 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *