आग लागून दीड कोटींचा कापूस खाक…
वर्धा, दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील चोरडीया कॉटन इंडस्ट्रिज येथे कापसाला आग लागून अंदाजे दीड कोटीचे नुकसान झाले आहे. शॉट सर्किट ने आग लागल्याचा अंदाज आहे.
समुद्र्पूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यातील जाम ते वरोरा मार्गावर गणेशपूर(नंदोरी) येथील चोराडिया कॉटन इंडस्ट्रिज मध्ये कापसाची खरेदी सुरु आहे.आजपर्यंत अंदाजे 2 हजार क्विंटल कापसाची खरीदी झाली असावी. आज दुपारी 2 वाजता जवळपास कापसाच्या गंजीतून धूर निघत असल्याचे निदर्शनात आले.
आग लागल्याची माहिती मिळताच हिंगणघाट येथील अग्निशमक बंब द्वारा आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. ही आग शॉट सर्किट ने आग लागली असावी असा अंदाज आहे , समुद्रपूर पोलीस पुढची चौकशी करित आहेत.
ML/KA/SL
21 Jan. 2023