मुंबईच्या हवेत वाढले विषारी वायूंचे प्रमाण

 मुंबईच्या हवेत वाढले विषारी वायूंचे प्रमाण

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या हिवाळ्यात मुंबई महानगर आणि परिसरातील शहरांतील हवेमध्ये हानिकारक असे वायू आणि अन्य प्रदुषकांचे प्रमाण वाढले आहे. तापमानातील घट आणि प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील हवा प्रदूषण अतिप्रदूषित पातळीवर पोहोचले आहे. मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त झाले आहे. यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहे. दम्याचे रुग्ण, श्वसनाचे त्रास असलेल्यांना याचा सर्वाधिक त्रास जाणवत आहे.

सफर संस्थेच्या सर्वेक्षण अहवालानुसार मुंबईतील माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, चेंबूर या भागांसह नवी मुंबई शहरातील हवेत विषारी घटकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल दिला आहे.

पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटसह बांधकामे, मेट्रो रेल्वेचे काम, बांधकाम व्यावसायिकांकडून उभारण्यात ईमारती यामुळे हवेत धुळीचे कण मिसळत आहेत. तसेच दाट धुके यामुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे. थंड वारे आणि वाऱ्याच्या वेगातील बदल आणि वाहनांचे उत्सर्जन वाढले आहे.

SL/KA/SL

21 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *