ईशान्य भारतातील या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर
नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यांमध्ये गेल्या वेळेप्रमाणे दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला एकाच वेळी मतदान होणार आहे. तीनही राज्यांचे निकाल 2 मार्चला येतील.
त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे, तर मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये मतदान झाले होते. तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी 31 चा आकडा आवश्यक आहे.
SL/KA/SL
18 Jan. 2023