आमदार नितीन देशमुख यांची तीन तास ACB चौकशी…
अमरावती, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती येथील ACB कार्यालयात दुपारी हजर झाले होते.त्यांची ACB च्या अधिकार्यांनी तीन तास चौकशी केली आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असे चौकशी झाल्यावर आमदार नितीन देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
दरम्यान एसीबी कार्यालया बाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एसीबी कार्यालया परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
ML/KA/PGB
17 Jan. 2023