8 वर्षानंतर शंकरपटावर धावली बैलजोडी..
अमरावती, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यतील तळेगाव दशासर येथील शंकर पटाला नवी संजीवनी मिळाली असून तब्बल आठ वर्षानंतर पहिल्यांदा सर्जा राजाची जोडी यावर्षी पटावर धावली .
तळेगाव दशासर येथील शंकर पट विदर्भात प्रसिद्ध आहे. न्यायालयाने बंदी घातल्यामुळे, हा शंकर पट बंद करण्यात आला होता. मात्र हा शंकर पट सुरू व्हावा यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी विधासभेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते आणि न्यायालयाच्या निकला नंतर याला मान्यता मिळाली मात्र त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष हा शंकरपट भरला नाही.
तब्बल आठ वर्षापर्यंत पटातील धावणाऱ्या बैलजोड्या शेतकऱ्यांच्या घरीच होत्या. यंदा शंकरपट सुरू झाल्या वर या ठिकाणी विविध जिल्ह्यातील अनेक बैलजोड्या दाखल झाल्या असून पाच दिवस हा शंकरपट सुरू राहणार आहे, या ठिकाणी बक्षीसाची लयलूटही होणार आहे. काल माजी आमदार विरेंद्र जगताप,कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख,सरपंच मीनाक्षी ठाकरे आदीच्या उपस्थितीत बैलजोडीचे पूजन करून शंकरपटाला प्रारंभ झाला.
शंकरपटाचे आयोजन कृषक सुधार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 15 ते 20 जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणाऱ्या या शंकरपटला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून या ठिकाणी शेतीला लागणारे विविध साहित्य खरेदीविक्री साठी असल्यामुळे यात्रेचे स्वरूप आले आहे.
ML/KA/SL
16 Jan. 2023