औरंगजेबाचे पोस्टर झळकले, हिंदू संघटना आक्रमक

 औरंगजेबाचे पोस्टर झळकले, हिंदू संघटना आक्रमक

वाशिम, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : मंगरुळपीर शहरातील उर्स मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे औरंगजेबाचे फोटो झळकविल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे.

वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात काल रात्री बाबा हयात कलदंर दर्ग्यातील उर्स निमित्त मंगरूळपीर शहरात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या रॅलीत औरंगजेबाचे फोटो असलेल्या बॅनरसह पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मंगरुळपीर शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत संबधीतांवर कारवाईची मागणी केली.

महत्त्वाची बाब म्हणजे उर्ससाठी पोलिसांनी फक्त दोन डीजे ची परवानगी दिल्या नंतर तब्बल २१ डीजे मिरवणुकी दरम्यान वाजवल्याचे समोर आले आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने पोलीस कारवाईच्या तयारीत आहेत.

ML/KA/SL

16 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *