नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ…

 नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ…

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना आज जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयातील फोनवर धमकी देणारे तीन फोन आले आहेत.Death threat to Nitin Gadkari, increase in security…

धमकी देणाऱ्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे द्या अन्यथा गडकरी यांना ठार मारू अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे . या संदर्भात गडकरी यांच्या कार्यालयाकडून शहरातील धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . धमकी नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर तसेच निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथक तसेच BDDS च्या पथकांकडून गडकरी यांच्या कार्यालयाची आणि निवासस्थानाची तपासणी करून पाहणी केली आणि त्यानंतर आवश्यक पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे .

धमकी देणारा फोन हा कर्नाटक राज्यातील हुबळी येथून आल्याचे सांगितले जात आहे. खंडणी मागितल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून फोन कॉल चा CDR नंबर तपासल्या जात आहे . तसेच पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आल्याची माहिती झोन 2 चे पोलीसउपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.

ML/KA/PGB
14 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *