गंगेत सुरू झाली जगातील सर्वात लांब रिव्हर क्रुझ
वाराणसी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीला दोन अनोख्या गोष्टींची भेट दिली आहे. पहिली भेट गंगा विलास क्रूझ आणि दुसरी 5 स्टार टेंट सिटी. पंतप्रधान मोदींनी त्यांचे व्हर्चुअल उद्घाटन केले. गंगा विलास क्रूझ काही वेळात जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ प्रवासाला सुरुवात करणार आहे. यादरम्यान ती 3200 किलोमीटरचा प्रवास करेल. वाराणसी ते आसाममधील दिब्रुगडपर्यंत जाईल.
पंतप्रधान मोदींनी गंगेच्या वाळूवर 30 हेक्टरवर बांधलेल्या आलिशान टेंट सिटी आणि गंगा विलास क्रूझचे उद्घाटन केले. टेंट सिटीमध्ये पर्यटकांसाठी 265 तंबू आहेत. 15 फेब्रुवारीपासून पर्यटक येथे बुकिंग करून राहू शकतात. गंगा रिव्हर क्रूझमध्ये 32 विदेशी पर्यटक असतील. ते 51 दिवसांचा प्रवास करणार आहे. या क्रूझमध्ये 5 स्टार हॉटेलसारख्या आलिशान सुविधा आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
“आज लोहरीचा आनंदोत्सव आहे. येत्या काही दिवसांत आपण मकरसंक्रांती, पोंगल, बिहू असे अनेक सण साजरे करणार आहोत. आपले सण, दान-दक्षिणा आणि संकल्पांच्या सिडशीसाठी आपल्या श्रद्धेचे एक वेगळे महत्त्व आहे. यामध्येही आपल्या नद्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा वेळी नदीशी संबंधित उत्सवाचे आपण साक्षीदार होत आहोत. काशी येथील टेंट सिटीच्या माध्यमातून देश आणि जगाच्या पर्यटकांना पर्यटनाचे नवे केंद्र मिळणार आहे.”
62.5 मीटर लांब आणि 12.8 मीटर रुंद, 40 हजार लिटर इंधन टाकी आणि 60 हजार लिटर पाण्याची टाकी. अप स्ट्रीममध्ये क्रूझचा वेग 10 ते 12 किमी प्रतितास आहे. डाउन स्ट्रीममध्ये क्रूझचा वेग 15 ते 20 किमी प्रतितास अशी या क्रुझची वैशिष्ट्ये आहेत.
या प्रवासात ही क्रुझ उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमधुन आणि बांगलादेशमधुन प्रवास करेल. वाराणसी, पाटणा, कोलकाता, ढाका, गुवाहाटी, दिब्रुग अशा प्रमुख 50 पर्यटन स्थळांचा यात समावेश आहे.
क्रूझचा मार्ग: या प्रवासात गंगा-भागीरथी-हुगळी नदी प्रणाली (राष्ट्रीय जल मार्ग 1), कोलकाता ते धुबरी (इंडो बांगला प्रोटोकॉल मार्ग) आणि ब्रह्मपुत्रा (राष्ट्रीय जल मार्ग 2). वाटेत 27 नद्या येतील. गंगा, भागीरथी, हुगळी, विद्यावती, मातला, सुंदरबन रिव्हर सिस्टम्स-5, मेघना, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या 27 नद्या लागतील.
SL/KA/SL
13 Jan. 2023