सोयाबीन तेलाच्या आयातीवर लागू होणार शुल्क

 सोयाबीन तेलाच्या आयातीवर लागू होणार शुल्क

नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :   केंद्राने दोन वर्षांसाठी २० लाख टन  सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला मागील वर्षी परवानगी दिली होती. पण आता पुढील आर्थिक वर्षापासून शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच १ एप्रिलपासून कच्चे सोयाबीन तेल (Row Soybean Oil) आयातीवर शुल्क लागू होणार आहे. यामुळं सोयातेलाचे दर (Soya Oil Rate) काहीसे वाढून सोयाबीनलाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील (Soybean Market) अभ्यासकांनी व्यक्त केला.

मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशातही खाद्यतेलाचे (Edible Oil) दर वाढले होते. पण वाढत्या महागाईचं कारण देत, भारत सरकारनं २४ मे २०२२ रोजी सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील शुल्क काढण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे प्रत्येकी २० लाख टन कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफुल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली.

आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. पामतेल ३० टक्क्यांनी स्वस्त झाले. तर सोयाबीन तेल १० टक्के आणि सूर्यफुल तेल ७ टक्क्यांनी नरमले. त्यामुळं सरकारनं १ एप्रिल २०२३ पासून कच्च्या सोयाबीन तेलाची शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द केला.

मागील वर्षभर सोयाबीन तेल आयातीवर शुल्क नव्हते. त्यामुळं सोयातेल स्वस्त होते. त्याचा परिणाम सोयाबीन दरावरही होत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढले. सोयापेंडचा भावही तेजीत आहे. मात्र खाद्यतेलाचे दर कमी आहेत. पण भारत सरकारनं आयातशुल्क लागू केल्यानं सोयातेलाचे दर सुधारु शकतात. याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होऊ शकतो.

SL/KA/SL

12 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *