राजकारणात एक आणि एक अकरा होते …

 राजकारणात एक आणि एक अकरा होते …

नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजकारणात एक आणि एक दोन नाही तर अकरा करावे लागतात तरच कमजोर ठिकाणे मजबूत करता येतात असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.In politics one and one were eleven …

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजपाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही, काँग्रेसचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष
सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा भाजपकडून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.

सत्यजित तांबे हे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असून त्यांच्या भाजपा प्रवेशाने मोठी खळबळ माजू शकते. काँग्रेसने सुधीर तांबे यांना इथून उमेदवारी दिली आहे.

सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास विचार करू असे बावनकुळे म्हणाले.
भाजपाने कुणालाही AB फॉर्म दिला नाही, सत्यजित तांबे यांची उद्या भूमिका काय असेल माहीत नाही.
आमच्याकडे अजून कुणी पाठिंबा मागितला नाही,
आम्ही काही क्षेत्रात अजूनही कमी आहोत असेही ते म्हणाले.

सहकार क्षेत्रामध्ये अजूनही आम्ही पूर्ण नाही, शिक्षक मतदार संघात अजूनही पूर्ण नाही अपूर्ण आहोत, जिथे आम्ही पूर्ण आहोत तिथे रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. असे सांगत राजकारणात एक आणि एक अकरा झाले पाहिजे, एक आणि एक दोन चालत नाही असे बावनकुळे म्हणाले.

ज्या ठिकाणी आम्ही कमजोर आहे त्या ठिकाणी एक आणि एक अकरा करावं लागतं, जनतेमध्ये आमची ताकद फार मोठी आहे .भारतीय जनता पार्टी आज इंडिपेंडेंट मोडवर काम करत आहे असेही त्यांनी सांगितले.

ML/KA/PGB
12 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *