बासमती तांदळाचे वेगळेपण जपण्यासाठी केंद्राने जाहीर केली मानके

 बासमती तांदळाचे वेगळेपण जपण्यासाठी केंद्राने जाहीर केली मानके

नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बासमती हा सुगंध, चव आणि लांब दाणे यांसाठी प्रसिद्ध असलेला तांदुळाचा जगप्रसिद्ध वाण मुख्यत: हरयाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये पिकवला जातो. बासमतीचा अनोखा स्वाद  जपण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण मानके जाहीर केली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारतात पहिल्यांदाच बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक मानके अधिसूचित केले आहेत. याबाबत केंद्रकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

नवीन मानकांनुसार बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असावा तसेच हा तांदुळ कृत्रिम रंग, पलिशिंग एजंट आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावा असे आदेश दिले आहेत. नवीन मानकं 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होतील. बासमती तांदळाचा व्यावसाय सुधारणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा नव्या मानकांचा उद्देश असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा बासमती उत्पादक आणि निर्यातदार देश आहे.जगातील बासमती तांदुळाच्या एकूण उत्पादनापैकी 60 % हून अधिक उत्पादन भारतात होते.

 

SL/KA/SL

12 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *