महाविकास आघाडीचे विधान परिषदेच्या पाचही जागांवर एकमत…

 महाविकास आघाडीचे विधान परिषदेच्या पाचही जागांवर एकमत…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.Mahavikas Aghadi unanimously on all the five seats of Legislative Council…

महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्रित व एकदिलाने लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

आज मराठवाड्याचा व नागपूरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या अमरावतीचा अर्ज दाखल करणार आहे. या बैठकीमध्ये इतर पक्षांनी जे अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेस आमदार वजाद मिर्झा, माजी आमदार व कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

ML/KA/PGB
11 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *