या राज्याने घातली Blood Painting वर बंदी
चेन्नई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी प्रेमवीर विविध युक्त्या करत असतात. यातील काही गोष्टी तर अघोरी वाटतील अशा असतात. यातलाच एक प्रकार म्हणजे रक्ताने प्रिय व्यक्तीचे नाव लिहिणे किंवा चित्र काढणे. आता असे करणारी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. कारण तमिळनाडू सरकारने Blood Painting करण्यावर कायद्याने बंदी घातली आहे.
तमिळनाडू मध्ये प्रियकर आपल्या प्रियसीला वाढदिवसानिमित्त स्वतःच्या रक्ताने काढलेले तिचे चित्र भेट देत असल्याच्या अनेक घटना दिसून आल्या. आरोग्याय विभागाकडून निदर्शनास आणल्या गेलेल्या या घटनांची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्री एम. ए. सुब्रमण्यम रक्ताने चित्र काढून देणाऱ्या एका स्टुडीओत पोहोचले. तेथे रक्ताने भरलेल्या बाटल्या पाहून ते अचंबित झाले आणि त्यांनी तत्काळ या प्रकारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
पेंटींगसाठी रक्त काढताना प्रोटोकॉल पाळला जात नाही, एकाच सुईने अनेकांचे रक्त काढले जाते. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. असे लक्षात आल्याने आरोग्य विभागाने ही बाब आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
SL/KA/SL
11 Jan. 2023