जगविख्यात बौद्ध धर्मगुरु ‘महाथेरो अजाय जयासारो’ येणार मुंबई भेटीला.
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगविख्यात बौद्ध धर्मगुरु ‘महाथेरो अजाहय जयासारो ‘थायलंड येथून भारत भेटीसाठी येणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुंबईमध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांना भेट देणार आहेत. ‘ग्लोबल मेत्ता फाउंडेशन’ या ‘ संस्थेच्या वतीने रविवार १५ जानेवारी २०२३ रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी जागतीक कीर्तीचे आदरणीय ‘महाथेरो अजाह्य जयासारो यांच्या धम्मावर आधारित मराठी अनुवादीत पुस्तकांचा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडणारआहे. प्रकाशनाच्या कार्यक्रमांतर आदरणीय महाथेरो अजाय जयासारो यांची धम्मदेसना होऊन कार्यक्रमाची सांगता होईन.
या कार्यक्रमला उद्योग खात्याचे सचिव हर्षदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची खास उपस्थिती असणार आहे. या चीवरदान सोहळ्यामध्ये उपासकांना स्वहस्ते चिवरदान करून सहभागी होता येणार आहे. ज्या उपासकांना चिवरदान कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9821445409 या मोबाईल क्रमांकावर आपले नाव नोंदवावे. आपण स्वतः चिवर घेऊन येणार असल्यास त्याची माहिती संस्थेस नोंदणी करतानाच देण्यात यावी. ज्यांची चिवरदान करण्याची ईच्छा आहे परंतु आर्थिक अडचण आहे अश्या उपासकांना ‘ग्लोबल मेता फाऊंडेशनतर्फे मोफत चिवर उपलब्ध करून दिले जाईल. या कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत राहील अशी माहिती प्रमुख आयोजक डॉ. विजय कदम व सोनाली रामटेके यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमासाठी पांढरे शुभ वस्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती ‘ग्लोबल मेता काऊंडेशनतर्फे डॉ. विजय कदम यांनी केली आहे.World famous Buddhist religious leader ‘Mahathero Ajay Jayasaro’ will visit Mumbai.
ML/KA/PGB
11 Jan. 2023