मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे 14-15 जानेवारीला ज्ञानगंगा संगीत महोत्सव
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एम फॉर सेवा ही चेन्नईत मुख्यालय असलेली आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र विस्तारण्यास उत्सुक आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, संस्थेच्या वतीने 14 -15 जानेवारी रोजी दोन दिवशीय ,तीन मैफलींचा ‘ ज्ञानगंगा संगीत महोत्सव 2023’ मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला आहे .
भारतातील अनेकविध सादरीकरण कलांचा समृद्ध वारसा जोपासण्यावर लक्ष केंद्रित करणारी मुंबईस्थित पंचम निषाद क्रिएटिव्ह्स ही संस्था या कार्यक्रमासाठी एम फॉर सेवाची इव्हेण्ट मॅनेजमेंट सहयोगी आहे.
एम फॉर सेवाच्या ग्रामीण भारताला शिक्षित करण्याच्या कार्यात सहभागी होणाऱ्या कलावंतांमध्ये शंकर महादेवन, रंजनी-गायत्री, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी, झी मराठी वाहिनीच्या सा रे ग म प:
लिटील चॅम्पियन मधील मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, पूजा गायतोंडे, अंतरा नंदी आणि अॅबी व्ही. व मेहताब अली इत्यादी प्रस्थापित 11 कलावंत आपली कला सादर करून या कामासाठी संस्थेला सहयोग करत आहेत.
2000 साली स्थापन झालेल्या एम फॉर सेवाचे उद्दिष्ट, सेवा, काळजी घेणे, शहरी व ग्रामीण भागातील विषमता दूर करणे, प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यास सक्षम करणे यांच्या माध्यमातून, समाजात कायापालट घडवून आणणे हे आहे. Gyan Ganga Music Festival on January 14-15 at Gateway of India in Mumbai गेल्या 22 वर्षांपासून एम फॉर सेवा या संस्थेने ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणाचा वसा घेतला आहे. आपले फ्लॅगशिप कार्यक्रम, छात्रालयम आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून संस्था हे काम करत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात विस्तृत अनुभव प्राप्त केल्यानंतर, एम फॉर सेवा, या भागातील आपले अस्तित्व अधिक बळकट करण्यास उत्सुक आहे. एम फॉर सेवा, दक्षिण भारतानंतर बळकट अस्तित्वाचा दावा जर कुठे करू शकत असेल, तर तो महाराष्ट्रात करू शकते.
“आम्ही 2007 मध्ये महाराष्ट्रात प्रवेश केला आणि सावंतवाडीमध्ये मुलगे व मुलींसाठी छात्रालयम स्थापन केली. तेव्हापासून आम्ही मागे वळून पाहिले नाही. आमचे देणगीदार, सहाय्यकर्ते, स्वयंसेवक, समन्वयक, कर्मचारी व अन्य हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे आमची शक्ती वाढत गेली आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक प्रकल्प राबवण्याच्या अनुभवातून आम्हाला ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प विस्तारण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. या भागात 2 सहशिक्षणात्मक निवासी शाळांचे काम सध्या सुरू आहे. या निधीउभारणीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत, आमच्या कार्याशी निगडित व्यक्ती, संस्था व कंपन्यांना आगामी प्रकल्पांसाठी मदतीचे आवाहन करण्याची आमची इच्छा आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमटीडीसी आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय यांचेही आम्हाला त्यांनी मनापासून केलेल्या मदतीसाठी, यानिमित्ताने, आभार मानायचे आहेत,” असे एम फॉर सेवाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती शीला बालाजी यांनी सांगितले .
ML/KA/PGB
11 Jan. 2023