चंदा कोचर दाम्पत्य जामीनावर मुक्त

 चंदा कोचर दाम्पत्य जामीनावर मुक्त

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई उच्च न्यायालयाने आज ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अंतरिम दिलासा देत जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.Chanda Kochhar couple free on bail

2012 मध्ये व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज देताना चंदा कोचर यांच्यावर अनियमितता आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कोचरांना 24 डिसेंबर रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली होती आणि दुसऱ्या दिवशी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले होते. सुरुवातीला सीबीआय कोठडीत असताना त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

कोचरांनी त्यांच्या अटकेदरम्यान सीआरपीसी कलमांचे उल्लंघन केल्याचा हवाला देत कायदेशीर प्रक्रियेला आव्हान दिले होते.कोर्टात आरोपींच्या याचिकेला केंद्रीय अन्वेषण विभागाने जोरदार विरोध केला होता .

ML/KA/PGB
9 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *