पुण्याचा अभिजीत कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी
हैदराबाद, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेची गदा पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकावली आहे. पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवू हिंदकेसरी किताब आपल्या नावावर केला.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अभिजीतने हरियाणाच्या सोमवीरवर एकदाही वरचढ होण्याची संधी दिली नाही. अभिजीतने ४ -० ने मात करत हिंद केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं. अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे.अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं २०१५ साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. २०१६ साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता.Abhijit Katake of Pune is the mankari of ‘Hindkesari’
अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचं दिसून येत आहे. २०१७ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटकेने नेत्रदिपक यश मिळवून महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता तसेच त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळालं होतं. आत्ताही अभिजीतने हिंद केसरीचा किताब मिळवून आपल्या यशाची घोडदौड सुरुच ठेवली आहे.
ML/KA/PGB
9 Jan. 2023