पहिल्या राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन.
वाशिम, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची चर्चा असून त्यामुळं गोरगरीबाच्या मुलांना शिक्षण मिळणं कठीण होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी तसेच जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यावर विचार मंथन करण्यासाठी वाशीम येथे राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.Organized the first State Level School Rescue Conference.
या परिषदेचे उद्घाटन भोपाळ येथील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अनिल सद्गोपाल यांच्याहस्ते करण्यात आले. तर मध्य प्रदेश येथील जाग्रुत आदिवासी महिला संघटनेच्या माधुरी कृष्णास्वामी यांच्यासह राज्यभरातील शिक्षक संघटना व शिक्षण प्रेमींची उपस्थिती होती.
दरम्यान, पटसंख्येअभावी राज्यातील एकही शाळा बंद करू नये असा सूर या राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेतून उमटला, त्याचबरोबर मराठी शाळांची सद्यस्थिती आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा यावरही सखोल विचार मंथन करण्यात आले.
ML/KA/PGB
8 Jan. 2023