पैनगंगेचे पात्र होणार स्वच्छ

 पैनगंगेचे पात्र होणार स्वच्छ

बुलडाणा, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ होणार असून जिल्हा प्रशासन ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आलाय.. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे.Pan Ganga will be clean

यामध्ये जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे. पैनगंगा नदीसोबतच नळगंगा आणि ज्ञानगंगा या नदीक्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येईल. नागरिकांमध्ये नदीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हे सर्व उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येत आहेत. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुटुंबासह एक दिवस श्रमदान करणार आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील नदींवर हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी तुम्मोड यांनी दिली आहे.

ML/KA/PGB
07 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *