धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

 धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

बीड, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला . यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे.

 

धनंजय मुंडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना परळी येथून रुग्णवाहिकेतून लातूर मार्गे एअर अंबुलन्स ने मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

 

धनंजय मुंडे मंगळवारी सर्व कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परळी शहरात येत होते . मध्यरात्री १२:३० च्या सुमारास त्यांच्या चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला . या अपघातात किरकोळ मार लागला असून आपल्या तब्बेतीबाबत काळजीचे कारण नसल्याचे स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे .

ML/KA/PGB

4 Jan 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *